एक फुकटचा सल्ला
हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर
तुमचे पैसे वाचू शकतील..
फक्त तिला म्हणा कि,
बोल जाडे! आज काय खाणार…?

गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला?
पप्पु: 16000..
गर्लफ्रेंडचे वडील: माझ्या मुलीला मी 15000 पॉकेट मनी देतो..
पप्पु: तेच धरुन 16000!
😂😂

जगातील सगळ्यात फास्ट
नेटवर्क दोन प्रकारे आहे..
1) Email
2) Female
एका मिनिटात इकडची गोष्ट
तिकडे पोहचवतात!!
😂😂

काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो,
“दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा”
कालपासून.. चाकू घेऊन मागे लागलीये..!!!
येडी.. कुठली…!

यमराज : बोल मानवा, तुला कुठे
जायचं आहे, स्वर्गात कि नरकात?
मानव : देवा, पृथ्वीवरून माझा
Mobile आणि Charger मागवून घ्या..
मी कुठे पण राहायला तयार आहे!
😂😂

समोरच्या अपार्टमेंटमधील
ती पाच मिनिट हात हलवत होती..
मग मी पण हात केला,
तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,
व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…
😂😂

लग्नाच्या पत्रिकेवर दोघांचं नाव होतं.
फक्त तिचं आत मध्ये होतं..
आणि माझं बाहेर…

आयुष्य खूप Boring झालं देवा,
उचल एकदाच..
आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर…
😂😂

देव आणि पतीदेव यांच्यात फरक काय?
देवाची आरती – सुखकर्ता दुःखकर्ता…
पतिदेवाची आरती – असेकर्ता तसेकर्ता आणि काकर्ता…
😂😂

आईने सांगितलं की,
बाळा तुला आवडेल
तिला नको,
जिला तू आवडतोस,
तिलाच सुन बनवून आण…!

बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते,
अशी कोणती वस्तु आहे
जी तुम्ही रोज बघू शकता,
पण आणू शकत नाही..
नवरा: शेजारीण!
लय मारला घरात नेऊन…
😂😂

ती मला हे सांगून सोडून गेली,
कि मला दुसरा भेटला आहे.
अरे त्या वेडीला कोण समजावणार..
तो दुसरा Account पण माझाच आहे
😂😂

तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए..!
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने…!!”

बँक मधून मुलीला फोन आला,
तुम्हाला Credit Card पाहीजे का?
मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे…

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो…

बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले..
नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ
मिळणारच होते…!

बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,
बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी…
😂😂

मम्मी दिवसातून 4 वेळेस म्हणते कधी जाती काय माहित ही बिमारी
कळतच नाहीये मला महणत आहे का कोरोनाला बोलतीय
तसच घर पण अभ्यास करायची जागा नसते.